भांगसी माता गड
भांगसी माता गड •औरंगाबाद मध्ये एक रम्य वातावरण असलेला हा गड. आपण बोलत आहे औरंगाबाद मध्ये एका शरणापुर गावाच्या बाजूला असलेला गड ज्याचे नाव आहे भांगसी माता गड एक असा गड आहे ज्याच्यावर गेल्यावर असं वाटतं की आपण एखाद्या रम्य वातावरणात आहे. औरंगाबाद City पासून 15 km दूर कोरडी व शरणपूर गावांच्या बाजूला आहे हा गड. भांगसी माता गड मध्ये अंबाबाई नावाची देवी आहे सकाळी व रात्री अंबाबाई देवीची पूजा होते ही देवी खूप पूर्वी पासून गडावर स्थित आहे. या देवीच्या दर्शनासाठी लोक खूप दूर दुरून येतात. आणि भांगसी बघण्यासाठी टुरिस्ट पण खूप सारे येतात. भांगसी माता गड वर कमी ते कमी 450 ते 500 पहिरया आहे. या गडाच्या वर गेल्यावर खालचा निसर्ग खूप सुंदर व रम्य दिसतो. पावसाळ्यात या गडावर गेल्यावर सर्व वातावरण खूप हिरवगार होतं. भांगसी माता गडावर गेल्यावर मोबाईल नेटवर्क चालल्या जातं. गडाच्या वर खूप जोर जोरात हवा चालू असते. भांगसी माता गडा मध्ये खूप धन लपवलेलं आहे असं पूर्वीचे लोक म्हणतात. या ग...